शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
2
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
3
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
4
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
5
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
6
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
7
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
8
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
9
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
10
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
11
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
12
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
13
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
14
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
15
याेगी यांच्या भक्तीमागे संघाचीही शक्ती; ‘संघ-भाजप’मध्ये सारे आलबेल : सहकार्यवाह होसबळे
16
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
17
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
18
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
19
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
20
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

लातूर, बीड, उस्मानाबादसाठी सुखद वार्ता; मांजरा धरण भरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:17 AM

महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत.

ठळक मुद्देएक ऑक्टोबरला १३७ दलघमीवर असलेला प्रकल्प पुढील विस दिवसात २०० दलघमी पार झाला होता. यंदा २६ सप्टेंबरला पन्नास टक्के साठा होता, तो पुढं महिनाभरात शंभर टक्के साठा झाला

- बालाजी अडसूळकळंब (जि. उस्मानाबाद) : मागच्या दोन महिन्यापासून दखलपात्र येवा सुरू असलेलं मांजरा धरण अखेर भरलं आहे. लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासाठी ही सुखद वार्ता असून बांधणीपासूनच्या चाळीस वर्षात मांजरा प्रकल्पात शतप्रतिशथ पाणीसाठा होण्याचा हा चौदावा योग आहे.

पाटोदा तालुक्यात उगम पावत बीड,ऊस्मानाबाद जिल्ह्याची सिमा बनून प्रवाही होत असलेल्या मांजरा नदीवर धनेगाव (ता.केज) व दाभा (ता.कळंब) यांच्या मधोमध उभारण्यात आलेल्या मांजरा प्रकल्पाची १९८० मध्ये बांधणी पुर्ण  झाली. महसूलीदृष्ट्या बीडमध्ये गणला जाणार्‍या या प्रकल्पावर कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, लातूर शहर व एमआयडीसी, मुरूड या शहरासह पन्नासेक गावाच्या पाणीपुरवठा योजना निर्भर आहेत. शिवाय यातील धारूर वगळता इतर चार  तालुक्यातील शेतीलाही प्रकल्पाचा आधार मिळतो. यामुळेच मांजराच्या पाणीसाठ्यावर तिन्ही जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झालेलं असतं.यंदा मागच्या दोन महिन्यांपासून मांजरा प्रकल्पात येवा येत असला तरी तो जेमतेम होता.यामुळे मजल, दरमजल करत मांजराने अखेर शतकपूर्ती करण्यात यश मिळवले आहे.

एक ऑक्टोबरला १३७ दलघमीवर असलेला प्रकल्प पुढील विस दिवसात २०० दलघमी पार झाला होता. पुढं यात वाढ होत अखेर मंगळवारी रात्री प्रकल्प आपल्या २२४.०९३ दलघमी या पुर्ण क्षमतेन भरला आहे. पाण्याच्या आवकीनुसार विसर्ग करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . 

धरण पुर्ण क्षमतेने भरण्याचा चौदावा योग... प्रकल्पाची बांधणी १९८० साली तर दोन्ही कालव्याचे काम १९८६ साली पुर्ण झाले. यातील डावा कालवा ९० तर उजवा कालवा ७८ किलोमीटर लांबीचा आहे.जोतापातळी ६३५.७२ मिटर,पुर्ण संचय पातळी ६४२. ३७ मिटर आहे.एकूण साठवण क्षमता २२४.०९३ तर मृतसाठा ४७.१४० दलघमी आहे.धरण प्रथम १९८८ साली भरले. यानंतर १९८९, १९९०, २००५, २००६,२०१०,२०११, २०१६, २०१७ या सालात सलग दोन वर्ष भरले. याशिवाय १९९६,१९९८ व २००० व २००८ असे १३ वेळा पुर्ण भरले होते. यंदा २६ सप्टेंबरला पन्नास टक्के साठा होता, तो पुढं महिनाभरात शंभर टक्के साठा झाला असून आजउद्या पाण्याचा विसर्ग केल्यास हा ओव्हरफ्लोचा हा चौदावा योग ठरणार आहे. 

कळंब तालुक्यातील १७ गावाला फायदा...

कळंब शहरापासूनच बॅकवॉटर सुरू होतं.पुढं रांजणी पर्यंतच्या मांजरा बेल्टमधील बॅकवॉटरच्या कळंब,खडकी,लोहटा,कोथळा, हिंगणगाव,करंजकल्ला आदी तर लाभक्षेत्रातील दाभा, शिरपूरा, सौदंणा, लासरा गावासह ताडगाव, घारगाव, रांजणी आदी तालुक्यातील १७ गावातील शेतीला मांजरा प्रकल्प वरदान ठरतो.

टॅग्स :WaterपाणीOsmanabadउस्मानाबाद