निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी ३९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. १५ जानेवारी रोजी उस्मानाबाद तालुक्यातील ६३, तुळजापूर तालुक्यातील ४८, उमरगा ३८, लोहारा २१, कळंब तालुका ५३, वाशी ३३, भूम ६१, परंडा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळित पार पडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी मिळून ७ हजार ३१ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूकही होऊन दोन महिने झाले तरी निवडणुकीत सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्याप मानधन मिळाले नाही.
जिल्ह्यात निवडणूका झालेल्या ३८२
ग्रापंचायती
४००
निवडणुकीत कर्तव्य बाजावलेले अधिकारी
६६३१
निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी
चौकट..
पहिल्या टप्प्यात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. हा निधी निवडणुकीच्या खर्चातच गेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सेवा बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनासाठी निधी अद्याप प्राप्त झाला नसून, निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तालुकानिहाय आढावा
तालुका ग्रामपंचायती अधिकारी कर्मचारी
उस्मानाबाद ६६ १२२४
तुळजापूर ५३ ९५४
उमरगा ४९ ९४६
लोहारा २६ ४१६
कळंब ५९ ९३८
भूम ७१ ९४५
परंडा ७० १०७०
वाशी ३४ ५४८