शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

उस्मानाबादकरांना मोठा दिलासा! उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजूर; समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 7:49 PM

उस्मानाबाद-उजनी समांतर पाणी याेजनेच्या मार्गातील माेठा अडथळा या माध्यमातून आता दूर झाला आहे.

उस्मानाबाद: शहरासाठी २०१३ पासून उजनी धरनातून पिण्यासाठी पाणी आणले जाते. परंतु, हे पाणी शहरासाठी पुरेसे नव्हते. समांतर याेजना राबवायची म्हटले तर उजनी धरणातील पाणी आरक्षणाचा अडथळा येत हाेता. हा मुख्य अडथळा दूर व्हावा, यासाठी पाणी आरक्षण वाढून मिळावे, म्हणून पालिकेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला हाेता. सततच्या प्रयत्नानंतर पूर्वीचे ६.६२२ आणि नवीन १५.५८८ मिळून आता २०.३९० दलघमी पाणी आरक्षण मंजूर झाले आहे. त्यामुळे आता उजनी-उस्मानाबाद समांतर पाणी याेजनेचा मार्ग माेकळा झाला आहे.

साधारपणे २०१६ मध्ये अटल अमृत योजनेच्या माध्यमातून उजनी धरणावरून दुप्पट क्षमतेने पाणी आणण्यासाठी जुन्या याेजनेचे अपग्रेडेशन करण्यात आले. त्यामुळे याेजनेची क्षमता ८ एमएलडीवरून १६ एमएलडी झाली. परंतु, हे करताना तत्कालीन सरकारने शहरासाठी २०२१ ची लोकसंख्या गृहित धरुन २६ एमएलडी (उजनी १६ तर तेरणा व रूईभर धरणावरून प्रत्येकी ५ एमलडी) पाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार याेजना मिळाली. परंतु, तेरणा तसेच रूईभर ही दाेन्ही धरणे दुष्काळ पडला की काेरडी पडतात. त्यामुळे शहराला गरजेपेक्षा १० एमएलडी पाणी कमी मिळत हाेते. आणि उजनी धरणातून ही गरज भागवायचे म्हटले तर ६.५ दलघमी पाणी आरक्षणामुळे मर्यादा येत हाेती. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर तांत्रिक बाबींचा अभ्यास करून तसा प्रस्ताव तयार केला.

दरम्यानच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक झाली. याच बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पाणी आरक्षण वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधितांना मागणीच्या अनुषंगाने कार्यवाहीचे आदेश दिले हाेते. यानंतर थाेडाही विलंब न करता नगर परिषदेची २९ डिसेंबर २०२० राेजी सभा घेऊन उजनी धरणात वाढीव पाणी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. तसेच कृष्णा-खाेरे मंडळाकडे रितसर प्रस्ताव दाखल केला. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर २०५१ सालापर्यंत पुरेल एवढे २०.३९० दलघमी पाणी आरक्षण मंजूर झाले. त्यामुळे आता उजनी-उस्मानाबाद समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा झाल आहे.

३०० काेटींचा डीपीआर तयार...उजनी धरणातील पाणी आरक्षण २०.६२२ दलघमी एवढे झाले आहे. ही उस्मानाबादकरांसाठी माेठी आनंदाची बाब आहे. उस्मानाबाद-उजनी समांतर पाणी याेजनेच्या मार्गातील माेठा अडथळा या माध्यमातून आता दूर झाला आहे. यापूर्वीच समांतर पाणी याेजनेसाठीचा ३०० काेटींचा डीपीआर पालिकेकडून तयार करण्यात आला आहे. आता या डीपीआरला तांत्रिक मान्यता घेऊन अटल अमृत याेजना टप्पा-२ अथवा इतर काेणत्याही शासकीय याेजनेतून प्रशासकीय मान्यता घेता येऊ शकते. यानंतर तात्काळ याेजनेचे काम सुरू करून २०५२ सालापर्यंत लाणारे पाणी उस्मानाबादकरांना मिळेल. - मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष,उस्मानाबाद

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादWaterपाणीDamधरण