जिल्ह्याची पाणीपातळी निश्चित करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या ११४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. या विहिरीच्या पाणीपातळीच्या नोंदीवरुन जिल्ह्याची पातळी ठरविली जात असते. त्यावरुन जिल्ह्याचा टंचाई आराखडा आखला जातो. यंदा मान्सूनमध्ये जून ते सप्टेंबबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०५ टक्के पाऊस झाला. विशेषत: सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याच्या बहुतांश मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे नदी, नाले, ओढे प्रवाहित झाले होते. तर विहिरीं, बोअरलाही पाणी वाढले आहे. त्यामुळे भूजल पातळीतही वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालातून समोर आले आहे. जानेवारी महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्यावतीने ११४ निरीक्षण विहिरीची पाणीपातळी तपासण्यात आली असता, १.१९ मीटरने वाढ झाली आहे.
चौकट...
बेसुमार पाणीउपशावर बंधन घालणे गरजेचे
यंदा मान्सूनमध्ये ५९० मिलीमीटर पाऊसाची झाला. त्याची टक्केवारी १०५ इतकी आहे. मागील तीन चार वर्षाच्या तुलनेत यंदा वार्षिक सरासरी ओलांडली होती. त्यामुळे पाणीसाठयातही वाढ झाली आहे. सध्या पाणीटंचाईचा सामना जिल्हावासियियांना करावा लागत नाही. मात्र, मुबलक पाणीसाठा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. त्यामुळे बेसुमार पाणीउपसा केला जात आहे. पाणीउपशावर बंधन घालावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कोट...
मागील काही वर्षात विविध खात्यातंर्गत जलसंधारणाची कामे झाली आहेत. शिवाय, यंदा मान्सूनमध्ये १०५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढला आहे. परिणामी, भूजल पातळीतही १.१९ मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा उन्ह्याळ्यात पाणीटंचाई भासणार नाही.
बी.एम. ठाकूर, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
तालुका वाढ मीटरमध्ये
उस्मानाबाद ०.६६
तुळजापूर १.७
उमरगा २.७५
लोहारा २.२६
कळंब ०.४६
भूम ०.८४
वाशी ०.२३
परंडा ०.६३