शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गटप्रवर्तक, आशा सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

By सूरज पाचपिंडे  | Published: October 19, 2023 6:43 PM

गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत.

धाराशिव : गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यात यावेत, या व इतर मागण्यांसाठी आशा सेविका, गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर गुरूवारी धडक मार्चा काढला. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रीय ग्रामीण अभियानाची कामे गटप्रवर्तक करत आहेत. बहुतांश गटप्रवर्तक हे पदवीधरही आहेत. शासनाकडूनच त्यांची नेमणूक केली जात आहे. त्यांना प्राथमिक आरोग्याच्या कार्यक्षेत्रात दौरे करून आशांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करावा लागतो. तसेच आशा स्वयंसेविकांच्या कामावरही देखरेख ठेवावी लागते. यात त्यांचा दिवसातील ८ तासांपेक्षा अधिक वेळ जातो. मात्र, शासनाकडून त्यांना कंत्राटी पदाचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासूनही ते वंचित राहात आहेत. शिवाय, आशा सेविकेलाही ऑनलाइन कामांकरिता युजर आयडी, पासवर्ड देण्यात आले असून, ऑनलाइन कामाची सक्ती करण्यात आली आहे.

मात्र, अनेक आशा सेविका सहावी ते दहावीपर्यंत शिकलेल्या असल्याने त्यांना ऑनलाइन कामे करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांतून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुरूवारी गटप्रवर्तक, आशा सेविकांनी एकत्र येत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालं बेपत्ता, मुख्यमंत्री हाय हाय, आरोग्यमंत्री हाय हाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

काय आहेत मागण्या: - गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत.- गटप्रर्वतकांना दौऱ्यावर ऑनलाइनची कामे विनामोबदला सांगू नयेत.- दिवाळीपूर्वी एक महिन्याच्या मानधनाएवढा बोनस देण्यात यावा.- आशा सेविकेला ऑनलाइन कामे सांगू नयेत.- आशा सेविकेला २६ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcollectorजिल्हाधिकारी