काक्रंबा (उस्मानाबाद ) : येथील ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर पोलिसांनी कारवाई करून २१ हजार १०० रूपयांचा गुटखा जप्त केला़ ही कारवाई रविवारी सकाळी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे आली़ या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
काक्रंबा येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद सिध्दसिंग कानडे यांच्या घरी अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून रविवारी सकाळी पोलिसांनी कानडे यांच्या घरी धाड मारली़ यावेळी विविध कंपन्यांचा चार पोत्यांमध्ये भरलेला २१ हजार १०० रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला़ या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरविंद कानडे विरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़