याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्यात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही शहरातील मुख्य चाैकातील एका टपरीमधून खुलेआम गुटखा विक्री हाेत असल्याची माहिती वाशी पाेलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, पाेलीस काॅन्स्टेबल नितीन जाधवर, नवनाथ सुरवसे, होमगार्ड देवकर, पठाण यांच्या पथकाने अचानक छापा मारला. या कारवाईत या टपरीमधून सहा हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुटखा विक्रेता फिरोज हामिद तांबोळी यास ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याच्याविरुद्ध वाशी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. त्यामुळे पाेलीस यंत्रणेने अशा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून हाेत आहे.
वाशी शहरातून गुटखा केला जप्त; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:22 AM