- शहरासह तालुक्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते.
शनिवारी सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होऊन विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत वाऱ्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे कित्येक झाडे उन्मळून पडली. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. जवळपास एक तास गारांसह पडलेल्या पावसाचे पाणी शहरातील मुन्शी प्लॉट, कुंभार प्लॉट, औटी प्लॉट, साने गुरुजी नगर, जुनी पेठ, बँक कॉलनी, पिस्के प्लॉट, वृंदावन कॉलनी भागातील अनेकांच्या घरामध्ये घुसले. परिणामी संसाराेपयाेगी साहित्याचे नुकसान झाले असल्याचे काही रहिवाशांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याच काळात शहराचा वीजपुरवठाही खंडित झाला हाेता. रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत झाला नव्हता.
चाैकट..
शनिवारी तालुक्यातील उमरगा शहरासह मुळज,माडज, गुगळगाव, वागदरी, कोरेगाव, गुंजोटी, एकोंडी,पळसगाव, चिंचोली, बेडगा, तुरोरी, कोळसूर, जकेकूर, एकुरगा आदी गावात झालेल्या पावसामुळे माेठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाले आहेत.