उस्मानाबाद : सद्य:स्थितीत तरुण-तरुणींमध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होऊ लागला आहे. यात अनेक मुलींना, महिलांना सोशल मीडियावरून ट्रोल केले जाते. बऱ्याचदा मॅसेंजर, इन्स्टाग्राम यांवरून त्यांचा एक प्रकारे पाठलाग केला जातो. कधी-कधी रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर अक्षरशः सूड उगविण्याचा प्रकार घडतो. अशा स्थितीत आपली बदनामी होऊ नये म्हणून महिला व मुलींकडून थेट तक्रारीची हिंमत दाखवली जात नाही. फार थोडी प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. यामुळे छळ करणाऱ्यांची हिंमत वाढत जाते. वेळीच आवाज उठवल्यास, विरोध केल्यास संबंधिताला कायदेशीर शिक्षा देणे सहज शक्य आहे.
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
आधुनिक युगात महिला व मुली स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी होणारा छळ मोकाटपणे सहन करतात.
महिला, मुलींना अजूनही बदनामीची भीती वाटते. त्यामुळे आरोपीचे फावते. बिनधास्तपणे तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
येथे करा तक्रार
१ सोशल मीडियावरून महिला किंवा मुलींचा छळ झाला तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
२ पोलीस अधीक्षकांना तक्रार केल्यास महिलांना न्याय मिळेल.
३ भरोसा सेल किंवा सायबर सेलकडेही तक्रार केल्यास त्याचा निर्वाळा होईल.
कोट...
छळ झाल्यास त्वरित तक्रार करा
फेसबुक, इन्स्टावर अनेक व्यक्ती फेक अकाउंट काढून महिलांचा छळ करीत असतात. हे घडू नये यासाठी मुलींनी सोशल मीडियाचा वापर सांभाळूनच करावा. महिला, मुलींनी फसवणूक झाल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलला तक्रार करावी.
अर्चना पाटील, सायबर सेल प्रमुख
सोशल माध्यमामध्ये महिला मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. त्यांनाही त्यांची मते मांडण्यासाठी स्वतंत्र मंच मिळाला आहे. पण, काही मंडळी या ठिकाणी संदर्भहीन टीका-टिप्पणी करतात, शेरेबाजी करतात. त्यामुळे महिलांना अपमानित झाल्याची भावना होते. अशा प्रकाराविरुद्ध आवाज उठवून महिलांनी कायदेशीर तक्रार करावी. जेणेकरून अशा प्रवृत्ती इतर कोणाला त्रास देणार नाहीत.
ज्योती सपाटे, सामाजिक कार्यकर्त्या, कळंब
पॉइंटर...
सोशल मीडियाकडे आलेल्या तक्रारी
वर्ष एकूण तक्रारी महिलांनी केलेल्या तक्रारी
२०२० ४ ११
२०२१ जुलै १ ०५
२०२० मध्ये सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी पोलीस ठाण्यांकडेच या सोशल मीडियावर फसवणुकीच्या तक्रारी नोंद होत होत्या.