उस्मानाबाद : झाड ताेडल्याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून एकास दगडाने मारून दंडास चावा घेतला. ही घटना १९ फेब्रुवारी राजी दुपारी १२ वाजता उमरगा तालुक्यातील कराळी शिवारात घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराळी येथील अशाेक निवृत्ती नागदे हे १९ फेब्रुवारी राेजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले हाेते. यावेळी त्यांच्या शेतातील बांधावर असलेले बाभळीचे झाड गावातीलच शंकर बिराप्पा दुधभाते यांनी बुंध्यापासून ताेडल्याचे दिसून आले. यावर अशाेक नागदे यांनी त्याचा जाब विचारला असता, शंकर दुधभाते यांनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच दगडाने मारून व दंडास चावा घेऊन जखमी केले. या प्रकरणी अशाेक नागदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध भादंसंचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.