प्रतिक्रिया...
विधानसभा निवडणुकीचे मानधन अद्याप मिळालेले नाही. मानधन मिळण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही मानधन मिळाले नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका होमगार्डनी सांगितले.
नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे मानधन मिळालेले नाही. १ फेब्रुवारीपासून काम बंद आहे. शिवजयंतीनिमित्त केवळ ३ दिवसाचा बंदोबस्त देण्यात आला आल्याचे होमगार्ड म्हटले.
२०१९ मध्ये तुळजापूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त १२ दिवस बंदोबस्तास ड्युटी केली. या कालावधीच्या बंदोबस्तातील मानधनही अद्यापही मिळाले नसल्याचे होमगार्डने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
१०००
जिल्ह्यातील होमगार्डची संख्या
३
महिन्यांचे मानधन थकीत
चौकट..
महिन्याला किती मिळते काम
लॉकडाऊन पूर्वी सण, समारंभ अशा बंदोबस्तासाठी होमगार्डसला महिन्यातून १० ते १५ दिवस काम मिळत होते. लॉकडाऊन काळातील पहिले तीन ते चार महिने काम होते. १ फेब्रवारीपासून काम बंदच आहे. होमगार्डला महिनाभर काम मिळावे, अशी मागणी होमगार्डच्या वतीने केली जात आहे.