कळंब : कोरोना संसर्गामुळे मृत पावलेल्या १२५ जणांचे अंत्यविधी करणाऱ्या येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ व दयावान प्रतिष्ठानच्यावतीने कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात हाहाकार माजला आहे. अशावेळी आपलं घरदार विसरून जिवाचा धोका पत्करून डॉक्टर, परिचारिका, नगर परिषद कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आरोग्य यंत्रणा आणि नगर परिषद कर्मचारी अखंड राबत आहे. अनेक लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोना लाटेत कामाचा खूप ताण वाढत आहे, तरीही रात्रंदिवस लोकांचा जीव वाचवण्यासाठी ते धडपडत आहेत.
या कामाची दखल घेत दयावान प्रतिष्ठान व राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धांचा ‘एक झाड उपक्रम’ या अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्यांना विविध फळांची व फुलांची रोपटे भेट देऊन अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय कळंब या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, डॉ. शोभा वायदंडे, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. भक्ती गीते, डॉ. मंजुराणी शेळके, डॉ. श्याम चौधरी, डॉ. इमरान शेख, परिचारिका यादव, उगलमुगले, बनकर, जाधवर, शेख व गोसावी, आयटीआय कोविड सेंटर या ठिकाणी डॉ. रुपेश चव्हाण, डॉ. स्नेहा कोयले, परिचारिका वनवे, वॉर्डबॉय अमित गांजेकर व मजहर सय्यद यांचा सन्मान करण्यात आला. नगर परिषद आरोग्य विभागात कल्याण गायकवाड, महादेव हाजगुडे, प्रसन्ना माळी, सतीश आईवले, सुधाकर धावारे, मच्छिंद्र ताटे, प्रतितयश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अब्दुल शेख, शुभम बिडलाम, धीरज गायकवाड, संजय इरेवर यांचा सन्मान पार पडला. या उपक्रमासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, दयावान प्रतिष्ठान अध्यक्ष इम्रान मुल्ला, अलिम दारुवाले, शकील काझी यांनी परिश्रम घेतले.
कॅप्शन :
कळंब येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व दयावान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णाच्या सेवेत असलेल्या मंडळींचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचा सत्कार करताना शकील काझी, विकास कदम, इम्रान मुल्ला, अलीम दारुवाले आदी.
------------------------------
(प्रतितयश गायकवाड हे नाव बराेबर आहे का?)