उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लागू करण्यात आलेला मनाई आदेश झुगारून हाॅटेल, दुकाने, पान टपरी सुरू ठेवल्या प्रकरणी पाचजणांविरूद्ध संबंधित ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. ही कारवाई १ जून राेजी करण्यात आली.
काेविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी विविध मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करीत उमरगा येथील समीर रशिद लाेणी, राम चंद्रकांत वजनम, गुंजाेटी येथील माेतीराम किशनराव बेळमकर, तुराेरी येथील निलुनगर तांडा येथील प्रभाकर किशन राठाेड यांनी १ जून राेजी अनुक्रमे आपल्या ताब्यातील कापड दुकान, पानटपरी, पुष्पमयुरी गृहिणी सेवा केंद्र तसेच किराणा दुकान सुरू ठेवल्याचे उमरगा पाेलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. तसेच वारदवाडी येथील दिलीप मुरलीधर साेनमाळी यांनी याच दिवशी गावातील आपले हाॅटेल सुरू ठेवल्याचे परंडा पाेलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. या प्रकरणी पाचही जणांविरूद्ध स्वतंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.