वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:04 PM2018-01-16T16:04:27+5:302018-01-17T04:35:01+5:30

यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

If the power is broken, it will not let the road go; Ajit Pawar's government warns of attacking the attack | वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा

वीज तोडाल तर रस्त्यावर फिरु देणार नाही; हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांचा सरकारला इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़

उस्मानाबाद : एकिकडे तेलंगणाचे सरकार शेतकर्‍यांना २४ तास वीज मोफत देत आहे़ असे असताना भाजप-सेनेचे सरकार मात्र वसुलीचा तगादा लावून शेतकर्‍यांची वीज तोडत आहे़ यापुढे शेतकर्‍यांची वीज तोडाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी उस्मानाबादेतून दिला़ 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाड्यातील दुसर्‍या टप्प्यास तुळजापुरातून सुरुवात झाली़ यानंतर उस्मानाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, डॉ.पद्मसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर, प्रवक्ते नवाब मलिक, राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहूल मोटे, विक्रम काळे, जि़.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ, विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती़ 

यावेळी अजित पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार फसवे सरकार आहे़ ते बोलतात एक अन् करतात एक़ सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठी आश्वासने दिली होती़ पण त्यांची पूर्तता केली नाही़ ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लोकांना फसविण्याचे काम करतंय’, अशा शब्दात सरकारची खिल्ली उडविली़ समाजांचे आरक्षण, नोटबंदी, शाळा मूठभर लोकांच्या हाती देण्याचा डाव, कर्जमाफी अशा विविध मुद्यांवरुनही अजित पवारांनी सरकारवर टीकेची तोफ डागली़

धनंजय मुंडे म्हणाले, सध्या केंद्र सरकारकडून जाहिराती केल्या जात आहेत़ म्हणे ‘देश बदल रहा है’़ देश बदलतोय की नाही ठाऊक नाही; पण सरकारविरोधी ही जनता पाहिल्यानंतर महाराष्ट्र नक्कीच बदलतोय़ औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ३५ निर्णय झाले होते़ त्यापैकी दहा निर्णयावरही अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत हे सरकार महाठग असल्याची टीका मुंडे यांनी केली़ 


कोरेगाव-भीमामागे मनुवादी वृत्ती

भाजप-सेनेचे सरकार काम करण्याऐवजी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करीत आहे़ कोरेगाव-भीमा प्रकरणातील मास्टरमार्इंड कोण? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे़ या घटनेमागे मनुवादी वृत्तींचा हात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला़


भाजपला गाजर, सेनेला मुळा़

भाजप-सेनेचे सरकार नुसती आश्वासनांची गाजरे लोकांना दाखवीत आहे़ काम काहीच करीत नाहीत़ त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला गाजर तर सेनेला मुळा हे निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी उपहासात्मक मागणी अजित पवारांनी केली़


तुळजाईच्या दरबारात ‘गोंधळ’

मराठवाड्यातील आंदोलनाची सुरुवात तुळजापुरातून करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावरच ‘जागरण गोंधळ’ मांडला़ यानंतर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी सरकारच्या कारभारावर नेत्यांनी सडकून टीका केली़ 

Web Title: If the power is broken, it will not let the road go; Ajit Pawar's government warns of attacking the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.