वाशी-सोयाबीन पिकावर बदलत्या वातावरणामुळे विविध प्रकारच्या कीड रोगांचा प्रादुर्भाव हाेऊ लागला आहे. त्यामुळे उत्पादकतेत घट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. कीड राेगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी केले आहे.
वाशी तालुक्यातील खरिपाचे ५५ हजार १८७ हेक्टर क्षेत्र असून, लागवडीलायक ४३ हजार ३५२ हेक्टर क्षेत्र आहे. २०२१-२२ मध्ये ३४ हजार ९७० हेक्टरवर सोयाबीनचा विक्रमी पेरा झालेला आहे. त्यापाठोपाठ उडीद, तूर, मका आदी पिकांचा समावेश आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणाचा फटका हा सोयाबीन पिकास बसत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सोयाबीन पिकाचे पाने खाणाऱ्या अळीपासून नुकसान टाळण्यासाठी प्रोफेनोफोस ५० ईसी ४०० मिली किंवा इंडॉक्सिकर्ब १५़८ ईसी १४० मिली किंवा क्लोरानट्रानीलीप्रोल १८़५ एस सी ६० मिली प्रती एकर याप्रमाणे फवारणी करण्यासाठी पत्रकाव्दारे कळवले आहे़ सोयाबीन पिवळे पडू नये, यासाठी एक किलो फेरस सल्फेट १०० मिलिलिटर पाण्यात फवारावे व चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड दोन हे ५० ग्रॅम १० लिटर पाण्यातून द्यावे, त्याचबरोबर १९-१९-१९ किंवा १२-६१ हे १०० ग्रॅम व ग्रेड दोन हे ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. साेबतच ज्या ठिकाणी साचलेले पाणी असेल, त्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करावी. वापसा येताच निंदणी करावी, असे आवाहनही काेयले यांनी केले आहे.
--------------------------------------------
उसामुळे उडीद, मुगाचे क्षेत्र घटले
उसासाठी मिळेना युरिया-तीनशे हेक्टर क्षेत्र वाढले
वाशी-सोयाबीनचे क्षेत्र वाढल्यामुळे उसाच्या क्षेत्रात घट न होता उडीद, मूग व मका या पिकांचा पेरा कमी झाला आहे. तालुक्यात ५३१ हेक्टर उसाचा खोडवा होता. त्यामुळे नवीन २९६ हेक्टरची भर पडली आहे. त्यामुळे आता उसाचे एकूण क्षेत्र ८२७ हेक्टरवर जाऊन ठेपले आहे. सध्या शेतकरी उसासाठी युरियाची मागणी करीत आहेत. हीच संधी साधत काही दुकानदार युरियासाेबतच इतर खते घेण्याची सक्ती करीत आहेत.
यंदा वाशी तालुक्यात वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे मागीलवर्षीप्रमाणे यंदाही शेकऱ्यांनी साेयाबीनवरच अधिक भर दिला आहे; तर दुसरीकडे उसाच्या क्षेत्रातही चांगली वाढ झाली आहे. एकीकडे उसाचे क्षेत्र वाढले असतानाच दुसरीकडे उडीद, मूग, मका आदी पिकांखालील क्षेत्र घटले आहे. सततच्या पावसामुळे उसाच्या पिकाची वाढ चांगली झाली आहे. आता या पिकासाठी युरियाची गरज आहे. परंतु, वाशी शहरासह परिसरातील काही दुकानदार शेकऱ्यांनी युरिया देताना इतर खते घेण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे अगाेदरच आर्थिक अडचणींचा सामना करणारे शेतकरी या प्रकाराने हैराण झाले आहेत.
काेट...
लेखी तक्रार द्यावी...
वाशी तालुक्यात कोणत्याही खताबरोबर लिंकिंग नाही. जे काेणी दुकानदार इतर खते घेण्यासाठी बंधने घालत असतील, त्यांची लेखी तक्रार द्यावी. चाैकशीतून दाेषी आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचा दंडुका उगारला जाईल, असा इशारा तालुका कृषी अधिकारी संताेष काेयले यांनी दिला आहे.