तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील महाराष्ट्रात विविध ठिकाणी सासरमध्ये संसार करीत असलेल्या १५० लेकींच्या पुढाकारातून व त्यांच्या लाखो रुपयांच्या अर्थसाहाय्याने विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधण्यात आले आहे. यासाठी प्रकाश पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती घेऊन दिल्या आहेत.
३ मे रोजी मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त सकाळी मंदिरासमोर हरिभजन, प्रकाश पाटील यांनी सपत्नीक अभिषेक, कळस पूजा केली. हभप नागनाथ स्वामी, सोलापूर येथील मठाधिपतींच्या हस्ते होम पेटवून विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व गावातील लेकींच्या हस्ते कळस चढविण्यात आला. त्यानंतर शिवकीर्ती प्रतिष्ठापनच्या वतीने उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाहेरगावाहून आलेल्या मोजक्या पाच लेकींना मंदिरात व घरोघरी जाऊन विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, साडी, काकण, चोळी करण्यात आली.
यासाठी सुभाष बिराजदार, पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, आकाश पाटील, शामराव धनवडे, चेतन पवार, अंबादास बिराजदार, राम सातपुते, दयानंद चव्हाण, शरद पवार, विजय पाटील, प्रशांत बिराजदार, ओम पाटील, नागनाथ कांबळे, युवराज बिराजदार, रोहित जाधव, तेजेस देवकर, सुनील इटकर, आकाश बिराजदार, प्रवीण बिराजदार यांच्यासह हनुमान भजनी मंडळातील सदस्यांनी पुढाकार घेतला.
फोटो---
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना गावच्या लेकी व आयोजक मंडळी.