जमात-ए-इस्लाम हिंदच्या उस्मानाबाद शाखेच्या कार्यालयात धर्मवीर कदम, दादासाहेब जेटीथोर, मसूद शेख, रणजित रणदिवे, नामदेव वाघमारे, शाहनवाज सय्यद, सजियोद्दीन शेख यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सिकंदर पटेल यांनी मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये नैतिक मूल्यांचा जो ऱ्हास होत चालला आहे, तो थांबविण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे जाणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक या सर्वच क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. भौतिक साधनांच्या प्राप्तीसाठी नैतिक मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. यामुळे समाजामध्ये अनिष्ठ प्रथा, व्यसनाधीनता, रूढी-परंपरा वाढत चालल्या आहेत. या अंधःकारातून मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना करता येईल व समाजात नैतिक मूल्ये कशाप्रकारे स्थापित करता येतील, याचा ऊहापोह करण्यासाठी जनसामान्यांशी संवाद या मोहिमेतून साधला जाणार आहे. प्रास्ताविक सिकंदर पटेल, सूत्रसंचालन शेख रियाज यांनी केले. या कार्यक्रमास जमात-ए-इस्लाम हिंदचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.
जमात-ए-इस्लाम हिंदची राज्यव्यापी मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:15 AM