शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

जीप बंद पडली अन् उघड झाली गांजा तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:46 PM

वाशी तालुक्यातील पारगाव येथे मंगळवारी रात्री ११.४० वाजण्याच्यासुमारास आंध्रप्रदेश राज्याची पासिंग असणारी जीप गिरवली रस्त्यावर बंद पडली होती.

ठळक मुद्दे तरुणांच्या सतर्कतेने नारळाखाली लपवलेला सहा क्विंटल गांजा जप्त

पारगाव (जि. उस्मानाबाद) : वरकरणी नारळाची वाहतूक करीत असल्याचे दर्शवत आतून मात्र गांजाची तस्करी करणाऱ्यांचे बिंग मंगळवारी मध्यरात्री पारगाव येथे फुटले. गावात अचानक तस्करांची ही जीप बंद पडली. यानंतर गावकरी जमा झाल्याचे पाहून तस्करांनी तेथून धूम ठोकल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत जीपमधील सहा क्विंटल गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

वाशी तालुक्यातील पारगाव येथे मंगळवारी रात्री ११.४० वाजण्याच्यासुमारास आंध्रप्रदेश राज्याची पासिंग असणारी जीप गिरवली रस्त्यावर बंद पडली होती. यावेळी उत्सुकतेपोटी गावातील काही तरुण या जीपकडे गेले असता, त्यांना पाहताच चालक व इतर काही साथीदारांनी जीप तेथेच सोडून धूम ठोकली. काही तरुणांनी त्यांचा पाठलागही केला, मात्र ते सापडले नाहीत. परत आल्यानंतर जीपमध्ये डोकावले असता, नारळ भरलेले दिसून आले. तोपर्यंत आणखीही काही नागरिक जागे झाले होते. त्यापैकी काहींनी हा संशयास्पद प्रकार पोलिसांना कळविला.

वाशी ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक चौरे, अंमलदार राजू लाटे, बळीराम यादव व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी फिटरकडून ही जीप सुरू करून घेतली. तसेच जीपमधील नारळांखाली असलेल्या पोत्यांची तपासणी केली असता, त्यात गांजा भरलेला दिसून आला. पोलिसांनी हे वाहन ठाण्यात लावून बुधवारी सकाळी पंचनाम्यासाठी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, भूम येथील वजनमापे निरीक्षक यांना पाचारण करण्यात आले. दुपारी ३ वाजता पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तेव्हा १६ पोत्यांमध्ये भरलेला व खालच्या बाजूस ठेवलेला सुमारे ६ क्विंटल १९ किलोग्रॅम गांजा या जीपमध्ये आढळून आला. दरम्यान, उशिरापर्यंत याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

नारळावर मारला डल्ला...पारगाव येथे मध्यरात्री जीप बंद पडल्यानंतर तस्कर तेथून पळून गेले. यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी जीपमध्ये डोकावल्यानंतर पाण्याचे नारळ दिसून आले. या नारळावर नागरिकांनी डल्ला मारला. जमेल तितके नारळ घेऊन जाण्याचा प्रयत्न नागरिक करीत होते. त्याचवेळी नारळाखाली संशयास्पद पोती आढळून आल्यानंतर काही सजग नागरिकांनी इतरांना थांबवून पोलिसांना माहिती दिली व त्यानंतर गांजा तस्करीचे बिंग फुटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद