वाशी : मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सावित्रीबाई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. जिजाऊ वंदना गाऊन अभिवादन करण्यात आले.
अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी भांडवले यांनी मनाेगत व्यक्त केले. तरुणाईने मराठा सेवा संघाने दिलेल्या विचारांचे अनुकरण केल्यास समाज सुधारण्यासाठी अधिक विलंब लागणार नाही, असे ते म्हणाले तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आशिष पाटील यांनी मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा सांगत, समाजात झालेल्या परिवर्तनाची माहिती दिली तसेच मराठा सेवा संघाने समाजाला दिलेल्या पंचसूत्रीचे महत्त्व अधोरेखित करत महिलांना विविध क्षेत्रात पुढाकार घेण्यास कायम प्रेरित करणारं मराठा सेवा संघ हे एकमेव संघटन असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्याध्यक्षपदी गाेलेगाव येथील प्रतापसिंह पाटील, तर तालुका सचिवपदी कन्हेरी येथील प्रमोद रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे वाशी तालुकाध्यक्ष दिनेश चौघुले, शुभम जाधव, हृषीकेश चौघुले, गीता भांडवले, जिजाऊ ब्रिगेडच्या रंजना कात्रे, प्रा. वैदेही गंभीरे, मनीषा पवार, आदींची उपस्थिती हाेती.