खामसवाडी येथील एका शासकीय जमिनीवर निवासी वास्तव्यासाठी काही कुटुंबांनी केलेली अतिक्रमणे मागच्या महिन्यात प्रशासनाने काढली होती. दरम्यान, या प्रकरणी शासनाचे नियम पायदळी तुडवत आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करीत खामसवाडीे येथील त्या नागरिकांनी जयभीम जनआंदोलनाचे चेतन शिंदे, अनिल हजारे यांच्या नेतृत्वाखाली कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनात अनिल हजारे, चेतन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आकाश गायकवाड, सूरज वाघमारे, उत्तम सावंत, भारत सावंत, राहुल सावंत, नवनाथ खरटमोल, प्रभू पाटोळे, शहाजी मगर, अशोक वाघ, नीता भंडारे, छाया माळी, स्वाती साळुंखे, अनिता सावंत, दीक्षा सावंत, सुरेखा सावंत, मैनाबाई चौरे, फुलाबाई सावंत, कांताबाई पाटुळे, मुक्ताबाई पाटुळे, सुबाबाई माळी, जाॅकी सावंत, चंद्रसेन सावंत, अनिल सावंत, आश्रुबा सावंत, आदी सहभागी झाले आहेत.
चौकट...
या आहेत मागण्या...
खामसवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करावीत, ऐन पावसाळ्यात निवासी अतिक्रमणे काढणाऱ्या प्रशासनातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यावर कारवाई करावी, घरे उद्ध्वस्त केल्यामुळे उघड्यावर पडलेल्या सर्व कुटुंबीयांना मदत करण्यात यावी, या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या लोकांची नावे मालकी हक्कात लावावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.