शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

प्रमाणपत्रासाठी ५० रुपयांची लाच घेताना कोतवाल जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 6:34 PM

लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून कारवाई

उस्मानाबाद : वाशी तहसील कार्यालयातील कोतवालास ५० रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी जेरबंद केले. खासरा व जनगणना प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने उपरोक्त रक्कम घेतली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रादारास जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयातून १९५१ सालचे खासरा व जनगणना अशी दोन पमाणपत्रे हवी होती. यासाठी ते सातत्याने तहसील कार्यालयात चकरा मारीत होते. मात्र, सदरील कामासाठी कोतवाल लक्ष्मण साहेबा शिंदे हा लाचेची मागणी करीत होता. वारंवार विनंती करूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक रविंद्र थोरात व पोनि विनय बहीर यांनी तक्रारीची शहानिशा केली. खात्री पटल्यानंतर मंगळवारी वाशी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात  (क्र.९) सापळा लावला. यावेळी कोतवाल शिंदे यास ५० रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. संबंधिताविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंर्तगत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसOsmanabadउस्मानाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग