उमरगा :
कोरोनाच्या वाढत्या रुग्णशाखेमुळे उपजिल्हा रुग्णालयात असलेले कोरोना तपासणी केंद्र आता नगरपरिषदेच्या वतीने अंतुबळी सभागृहात हलविण्यात आले आहे. या सभागृहात लागणारी व्यवस्था रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. येथील नागरिकांनी आरटीपीसीआर आणि रॅपिड ऑन्टिजेन टेस्ट करण्यासाठी शहरातील अंतुबळी सभागृहामध्ये यावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी केले आहे.
रोटरी क्लबच्या वतीने कोरोना तपासणी सेंटरचे डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. भोसले, पूजा बायस, शिदोरे, टेक्निशियन स्वामी व गिरीश कडगंचे यांचे स्वागत करून या कोरोना तपासणी केंद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ट्रेनर संजय अस्वले व रोटेरियन्स उपस्थित होते.