दूध परीक्षण यंत्र लंपास
भूम - तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील सचिन श्रीकृष्ण वसतकर यांच्या हाडाेंग्री येथील डेअरी दुकानातील दूध परीक्षण यंत्र २६ डिसेंबर राेजी लंपास केले. याप्रकरणी वसतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध भूम पाेलीस ठाण्यात ३० डिसेंबर राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
देशी दारूची अवैधरित्या विक्री
कळंब - तालुक्यातील पिंपळगाव (डाे) येथील सुजित टेकाळे यांनी अवैध दारू विक्रीच्या उद्देशाने दारूच्या १४ बाटल्या बाळगल्याचे पाेलीस पथकास आढळून आले. याप्रकरणी मुद्देमाल जप्त करून संबंधिताविरुद कळंब पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
जुगारअड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल
उस्मानाबाद - शहरातील नेहरू चाैकातील जुगारअड्ड्यावर उस्मानाबाद शहर ठाण्याच्या पथकाने ३० डिसेंबर राेजी अचानक छापा मारला. या कारवाईत समीर शेख, मुख्तार शेख, किरण जानराव (तिघे रा. उस्मानाबाद) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व राेख ३ हजार २१० रुपये जप्त करण्यात आले. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
कारची दुचाकीला धडक, एक जखमी
उस्मानाबाद - कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना २८ डिसेंबर राेजी डी-मार्टनजीकच्या रस्त्यावर घडली. या अपघातात सुनील ढवण (रा. काजळा) यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेले मनाेहर हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ढवण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.