शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
5
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
6
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
7
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
8
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
10
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
11
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
12
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
13
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
14
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
15
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
16
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
17
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
18
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
19
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
20
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

उस्मानाबादेत महाविकास आघाडीला धक्का; जि.प. अध्यक्ष- उपाध्यक्ष पदावर भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:29 IST

अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्ष पदी धनंजय सावंत यांची वर्णी

ठळक मुद्दे आमदार सावंत गटाच्या सदस्यांची भाजपला साथनिवडीनंतर आमदार सावंत आणि आमदार पाटील समर्थकांनी जल्लोष केला. 

उस्मानाबाद - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. हेच समीकरण जिल्हा परिषदेत आकारास येत असतानाच नाट्यमय घडामोडी घडल्या. सेना आमदार तानाजी सावंत यांच्या गटाने केलेल्या मदतीमुळे महाविकास आघडीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. अध्यक्षपदी राष्ट्रवादीतील भाजपा समर्थक अस्मिता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची वर्णी लागली आहे.

सावंतांनी ताणला सेनेवरच बाण, जिल्हा परिषदेत भाजपाला मतदान 

जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीसातिच्या प्रक्रियेला बुधवारी सकाळी १० वाजता  सुरुवात झाली. तोवर महाविकास आघाडीत सर्व आलबेल होते. असे असतानाच सेना आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि भाजपा आमदार सुजितसिंह ठाकूर एकाच गाडीतून जिल्हा परिषद आवारात दाखल झाले. आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत मिळाले. यानंतर काही क्षणातच भाजपा आमदार पाटील गटाच्या अस्मिता कांबळे यांचा अध्यक्ष पदासाठी तर सेनेचे आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी सेनेच्या अंजली शेरखाने यांची तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रकाश आष्टे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सरली असता निवडणूक रिंगणात एकापेक्षा जास्त उमेदवार राहिल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महाआघाडी देणार भाजपला टक्कर

यावेळी भाजपा आमदार राणा पाटील गटाच्या कांबळे यांना 30 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या शेरखाने यांना 23 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कांबळे यांना विजयी घोषित केले. यानंतर उपाध्यक्ष पदासाठी मतदान झाले. आ. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनाही 30 मते मिळाली. तर काँग्रेसचे आष्टे यांना 23 मते मिळाली. त्यामुळे सात मतांनी सावंत विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय  अधिकाऱ्यांनी घोषित केले. निवडीनंतर आमदार सावंत आणि आमदार पाटील समर्थकांनी जल्लोष केला. 

सावंतांची नाराजी भोवली...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने आमदार प्रा. तानाजी सावंत नाराज आहेत. त्यांच्या याच नाराजीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. त्यांच्या गटाच्या  सदस्यांनी केलेल्या मदतीमुळे अध्यक्ष पदाच्या उमेदवार भाजप समर्थक अस्मिता कांबळे यांचा विजय सोपा झाला. तर सेनेच्या उमेदवार शेरखाने यांना पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषदShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा