उस्मानाबाद -एकीकडे भाजपाला नमवत राज्यात शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी असे तीन पक्षाचे सरकार सत्तेर आले हाेते. हाच फाॅर्म्युला उस्मानाबाद जिल्हा परिषदेत प्रत्यक्षात उतरणार, हे शेवटच्या क्षणापर्यंत वाटत असतानाच भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी थेट शिवसेनेत फुट पाडत सावंत गट आपल्या बाजुने वळवित महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्वप्ने धुळीस मिळविली. जिल्ह्यातील स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या राजकारणातील सरत्या वर्षातील ही प्रमुख घडामाेड मानली जाते.
विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली हाेती. यानंतर काही दिवसांतच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे राज्याप्रमाणेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न झाले. तेवढे संख्याबळी हाेत हाेते. परंतु, भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चकवा देत थेट शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या गटाल फाेडले. अखेरच्या दिवशी घडलेल्या या घडामाेडीमुळे महाआघाडीचे नेतेही फार काही जाेर लावू शकले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत असतानाही अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या परंतु, भाजपा आमदार पाटील समर्थक अस्मिता कांबळे विराजमान झाल्या. तर सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजावलेल्या आ. प्रा. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उपाध्यक्षपद मिळाले. सभापती निवडीवेळीही महाविकास आघाडीच्या पदरी निराशा आली. दत्ता साळुंके, दिग्वीजय शिंदे, दत्ता देऊळकर, काेरे यांना संधी मिळाली.
अधिकार्यांतही खांदेपालट...
एकीकडे वर्षाच्या सुरूवातीलाच नवीन शिलेदार सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले. तर दुसरीकडे प्रशासनातही माेठ्या प्रमाणात खांदेपालट झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजय काेलते यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डाॅ. विजयकुमार फड रूजू झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या जागी अनिलकुमार नवाळे आले. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नितीन भाेसले हे आले. पंचायत विभागाचे अजिंक्य पवार यांची बदली झाल्यानंतर नितीन दाताळ रूजू झाले. या प्रमुख मंडळीसाेबतच अन्य अधिकारीही रूजू झाले आहेत.
पालिकेतही धाेबीपछाड...
सरत्या वर्षाच्या सुरूवातीलाच भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतील समर्थक नगरसेवकांच्या उस्मानाबाद पालिकेत सेनेला धाेबीपछाड दिली. सर्व विषय समित्यांवर मूळ भाजप व समर्थक नगरसेवक विराजमान झाले. उपनगराध्यक्षपदी अभय इंगळे तर सभापतीपदी राणी पवार, विठाबाई पेठे, राजकन्या आडसूळ, युवराज नळे यांना संधी मिळाली.
पंचायत समितीत राखली सत्ता...
२०२० च्या अखेरिस म्हणजे डिसेंबर महिन्यात उस्मानाबाद पंचायत समितीचे उपसभापती तथा आ. पाटील मर्थक संजय लाेखंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी सांजा गणातील आशिष नायकल यांना संधी देण्यात आली. विराेधकांकडे पुरसे संख्याबळ नसल्याने ही निवड बिनविराेध झाली.