अनेक ठिकाणच्या रक्तपेढीत आज रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे.
सोमवारी सकाळी ९ वाजता रक्तदानाला सुरुवात होईल. सकाळी १० वाजता उद्घाटन आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, डॉ. दामोदर पतंगे, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, मुरुम बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभयराजे चालुक्य, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, शिवसेनेचे किरण गायकवाड आदींंच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. हे शिबिर श्रीकृष्ण रक्तपेढीच्या सहकार्याने होत असून, यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून रक्तदानाची लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
यांना करता येईल रक्तदान...
संस्था - संघटनांचा शिबिरात सहभाग...
उमरगा येथील मराठा वॉरियर्स ग्रुप, संविधान विचार मंच, जिजाऊ ब्रिगेड, वीरशैव कक्कय्या युवक संघटन, भीमराष्ट्र ग्रुप, नो चॅलेंज ग्रुप यांच्यासह विविध संस्था व संघटना या उपक्रमात सहभागी होत आहेत.