लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : काेराेनाच्या पहिल्या लाटेत मुस्लिम समाजबांधवांनी पालिकेच्या साथीने ठिकठिकाणी माेहल्ला क्लिनिक सुरू केले हाेते. हे क्लिनिक संकट काळात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले हाेते. कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर ही क्लिनिक बंद करण्यात आली. मात्र, सध्या काेराेनाची दुसरी लाट अत्यंत तीव्र आहे. रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढू हाेऊ लागली आहे. त्यामुळे ही संकल्पना पुन्हा राबविण्याचा निर्धार करत ख्वाॅजा नगरातील शम्स चाैकात पहिल्या क्लिनिकचा प्रारंभ आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते झाला.
जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग प्रचंड गतीने वाढू लागला आहे. दररोज आढळत असलेल्यांपैकी जवळपास ५० टक्के रूग्ण हे एकट्या उस्मानाबाद शहरातील आहेत. संकटाची ही तीव्रता लक्षात घेऊन मुस्लिम समाजबांधवांनी माेहल्ला क्लिनिक पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला. पहिल्या लाटेतही जवळपास आठ ते नऊ क्लिनिकद्वारे सेवा देण्यात आली. नगरसेवक खलिफा कुरेशी यांच्या पुढाकारातून ख्वाॅजा नगर भागातील शम्स चाैकात हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. इतर भागातही गरजेनुसार क्लिनिक सुरू करण्यासाठी लाेकप्रतिनिधी, समाजबांधवांनी पुढे यावे. पालिकाही आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी यावेळी दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, मसूदभाई शेख, डॉ. खान, नगरसेवक खलिफा कुरेशी, खलील सय्यद, अयाज शेख, नगरसेवक बाबा मुजावर, इस्माईल शेख, साबेर सय्यद, वाजीद पठाण, मुजीब काझी, आदी उपस्थित हाेते.
कोविड - १९ या जागतिक महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील वर्षी आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये नगर परिषद, उस्मानाबाद व मुस्लिम समाजबांधवांतर्फे मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना राबविण्यात आली होती. या संकल्पनेतून कोविड - १९ चा प्रसार थांबविण्यास नगर परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
त्याप्रमाणेच कोविडच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा यावर्षीही मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून, शनिवारी शम्स चौक ख्वाॅजा नगर येथे नगरसेवक खलिफा कुरेशी व सहकाऱ्यांच्या पुढाकारातून मोहल्ला क्लिनिक क्रमांक १चे उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, मसूदभाई शेख, डॉ. खान, नगरसेवक खलिफा कुरेशी, खलील सय्यद, अयाज (बबलू) शेख, नगरसेवक बाबा मुजावर, इस्माईल शेख, साबेर सय्यद, वाजीद पठाण, मुजीब काझी, आदींसह निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.