शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

मांजरा धरण ओव्हर फ्लो, तीन जिल्ह्याची चिंता मिटली; दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 1:46 PM

लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला.

कळंब ( धाराशिव): मागच्या दोन महिन्यापासून थोडा थोडा येवा दाखल होत असलेल्या मांजरा प्रकल्पाची झोळी यंदा भरणार का? असा प्रश्न निर्माण नागरिकांत होता. लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून १ हजार ७३० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

धाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळेच हा प्रकल्प भरला का? याकडे तिन्ही जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. यंदा प्रकल्पात प्रथमच जून महिन्यातही थोडासा का होईना येवा दाखल झाला. पुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात अल्पसा का होईना येवा सातत्य सुरूच राहिले . मात्र, तो येवा दखलपात्र नसल्याने प्रकल्प महत्तम पाणी पातळीकडे जात नव्हता. यातच २ सप्टेंबरला पाणलोट क्षेत्रातील कळंब, वाशी, भूम, बीड, पाटोदा भागात जोरदार पाऊस झाला अन् हंगामातील दखलपात्र येव्याची नोंद होवू लागली. यातही २१ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला अन् प्रकल्प आपल्या ६४२ मिटर पाणी पातळीच्या समीप पोहचला. 

सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो... २०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे असे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.

विसर्ग सुरू, दोन दारे उंचावली...बुधवारी दुपारी धरणाची महत्तम पाणी पातळी ६४२.२ मिटर व साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी 'मेंटेन' ठेवण्यासाठी द्वॉर परिचालन कार्यवाही सुरू करण्यात आली. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून तब्बल १ हजार ७६० क्युसेक्स या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्रीच नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला होता.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद