शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

मस्सा खंडेश्वरी शिवारात पकडला सव्वा कोटींचा गांजा, आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:24 AM

मस्सा खंडेश्वरी शिवारातील एका शेतात गंजीमध्ये गांजा दडवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक गजानन ...

मस्सा खंडेश्वरी शिवारातील एका शेतात गंजीमध्ये गांजा दडवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी या माहितीची खात्री केल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलंगेकर, उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी जगदाळे, ठाकूर, घुगे, सय्यद, चव्हाण, जाधवर, ढगारे, मरलापल्ले, चौरे व माने असा मोठा फौजफाटा मस्सा शिवाराकडे रवाना झाला. मुद्देमाल जास्त किमतीचा असल्याने आरोपींकडून प्रतिहल्ल्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सूचनेप्रमाणे आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या पथकाने शेतातील गंजीत लपवून ठेवलेल्या गांजावर रेड केली. तेव्हा तब्बल ४७ पोत्यांमध्ये बांधून ठेवलेला गांजा या पथकास आढळून आला. तो जप्त करून मोजदाद केली असता त्याचे वजन १ हजार १३२ किलो ६६ ग्रॅम इतके भरले. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे १ कोटी २४ लाख ५९ हजार २६० रुपये इतकी आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेने कारवाई केल्याचे कळताच आरोपी बालाजी छगन काळे व राजेंद्र उर्फ दादा छगन काळे (दोघेही रा. मस्सा) हे पसार झाले आहेत. याप्रकरणी कळंब ठाण्यात उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता आरोपींचा शोध घेत असून, हा गांजा नेमका कोठे पाठवला जाणार होता, याचाही तपास केला जाणार आहे.

010621\01osm_1_01062021_41.jpg

मस्सा खंडेश्वरी शिवारात छापा टाकून जप्त केलेला ४७ पोती गांजा.