तेर प्
तेर - उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अरेबिया अन्सार मुलाणी (९८.८०), दिव्या विठ्ठल खरात (९६ .२०), प्रणिता विजयकुमार जाधवर (९५.८०) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर साक्षी सुरेश भोरे (९४.४०), अर्पिता कल्याण गायकवाड (९४ .००), कदम श्रध्दा देवेंद्र (९३.४०), नम्रता महादेव मुळे (९३.२०), ओम नंदू रोडगे (९२.६०), प्राजक्ता दीपक खरात (९१.६०), गौरी अनिल ढोले (९१.६०), रुक्सार मालिकबाबा तांबोळी (९१.४०), आरती नानासाहेब बिटे (९१.००), ज्योती सुभाष चव्हाण (९१.००), प्रकाश धनंजय देवकते याने ९०.८० टक्के गुण मिळविले. मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जे. बी. बोराडे , ए. बी. वाघिरे , ए. ए. शितोळे, आर. ए. देवकते, डी. डी. राऊत, ए. यू. गोडगे, ए. बी. नितळीकर, ए. ए. कांबळे, ए. डी. राठोड , के. ए. सय्यद, ए. डी घाडगे, ए. डी. नरसिंगे, सूर्यकांत खटिंग, हरी खोटे, पालक विठ्ठल खरात, मालिकबाबा तांबोळी, अन्सार मुलानी आदींची उपस्थिती हाेती.