चौकट...
कोरोना काळात नवे आठ रुग्ण
जिल्ह्यात चाळीस थॅलेसेमिया आजाराच्या रुग्णांची नोंद होती. या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतून रक्तपुरवठा होतो. तसेच या ठिकाणी रक्त पिशवी उपलब्ध नसल्यास खासगी रक्तपेढ्यातूनही या रुग्णांना रक्त दिले जात आहे. कोरोना काळात परजिल्ह्यात कामानिमित्त असलेले नागरिक मोठ्या संख्येने जिल्ह्यात परतले आहेत. यात आठ थॅलेसेमिया आजाराचे रुग्ण आहेत.
कोट...
थॅलेसेमिया रक्तव्याधित अनुवंशिक जनुकाच्या प्रभावामुळे पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबीन तयार होत नाही. थॅलेसेमियात मायनर व मेजर असे दोन प्रकार आहेत. मायनर थॅलेसेमियाच्या रुग्णांना उपचाराची फारशी गरज भासत नाही, तर मेजर थॅलेसेमिया आजाराच्या रुग्णांना ४ ते ६ आठवड्यांनी रक्त देण्याची आवश्यकता असते. त्यांना जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. रुग्णांना मोफत रक्त दिले जाते.
डॉ. अश्विनी गोरे
रक्तसंक्रमण अधिकारी, शासकीय रक्तपेढी उस्मानाबाद