अरूण देशमुख
भूम : तालुक्यात ७१ ग्रामपंचीयतसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आसल्याने ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, तालुक्यात शिवसेना विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आशाच लढती बहुतांश ठिकाणी रंगतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
कोरोनामुळे निवडणुका काही महिने लांबल्या. त्यात पुन्हा प्रशासक नेमून ग्रामपंचायतचा कारभार हाकला होता. आता निवडणूक लागल्याने गावपातळीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. तालुक्यात ईट पाथरुड माणकेश्वर वालवड या गावातील लढती रंगतदार होणार असल्याने याकडे अनेक राजकिय पक्षाचे लक्ष लागले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी पक्ष बदलल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत कितपत होतो, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. प्रामुख्याने गावचा सर्वागिण विकास, हाच मुद्दा प्रचारादरम्यान दिसून येईल, असे चित्र आहे. बहुतांश गावात जुने कारभारी विरुद्ध नवीन युवक असेही चित्र पहावयास मिळेल.
चौकट.....
अशी राहील खर्च मर्यादा
यंदा खर्चाची मर्यादा गत २०१५ ग्रामपंचायत निवडणुकीच्या तुलनेत अशी राहिल मागील २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांसाठी २५ हजार खर्चाची मर्यादा होती. यंदा ७ ते ९ सदस्यसंख्या आसलेल्या ग्रामपंचायतसाठी २५ हजार, ११ व १३ सदस्य ग्रामपंचायतसाठी ३५ हजार तर १५ व १७ सदस्य आसलेल्या ग्रामपंचायतसाठी ५० हजार खर्चाची मर्यादा राहणार आहे
चौकट.....
मागील २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५८ ग्रामपंचायतसाठी ८५.३९ टक्के मतदान झाले होते. आता ७१ ग्रामपंचायतसाठी मतदान होत असून, यात ५० हजार ३२३ पुरुष तर ४३ हजार ८३२ महिला असे एकूण ९४ हजार १५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत
चौकट.....
२२० मतदान केंद्र
यंदा कोरोनामुळे तहसील कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी आलमप्रभू देवस्थान येथील हॉलमध्ये २८ टेबलवर उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यात २२० मतदान केद्रावर मतदान होत असून, यासाठी ९०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.