प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीकरण करावे, कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, नर्स तसेच अन्य सर्वांनीच आपला पूर्ण अनुभव पणाला लावून या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा, घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घ्यावी. बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात. पॉझिटिव्ह रुग्णांना तत्काळ तुळजापूर येथील कोविड सेंटरवर पाठवण्यात यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा व प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही केले. यावेळी नळदुर्ग शिवसेना शहर प्रमुख संतोष पुदाले, माऊली घोडके, नायब तहसीलदार भारती, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य केंद्रास खासदारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:32 AM