शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

पोलिसांना पिस्तूल असल्याची खबर, कारवाईनंतर निघाले लायटर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 11:56 AM

शक्यता, अशक्यतेचा विचार न करता 'अलर्ट' होत कामाला लागत असतात.

ठळक मुद्देसाधारणतः आठच्या सुमारास  पोलिसांना एक गुप्त माहिती मिळते.हॉटेलात मैफल जमवलेल्या तिघा तरूणापैकी एकाकडे गावठी बंदुक

कळंब (जि. उस्मानाबाद) : एका हॉटेलात, एक व्यक्ती जेवनाच्या टेबलावर पिस्तुल घेवून बसला आहे अशी पोलिसांना माहिती मिळते. यास गांभिर्याने घेत प्रथम सिव्हील ड्रेसवरील दोन पोलिस कर्मचारी दुरुन खात्री करतात. यानंतर अधिकार्‍यांसह मोठा फौजफाटा तेथे दाखल होत, त्या व्यक्तीवर झडप घालतो. मात्र, पुढं हाती आलेली ती वस्तू पिस्तुल नव्हे तर 'लायटर' निघते.सिनेमात शोभावा असा व पोलिसांची सतर्कता दर्शवणारा हा प्रसंग कळंब शहरात घडला आहे. ( News that the police have a pistol, lighters came out after the action ) 

पोलिसांना अनेकदा गुप्त माहिती मिळत असते. कायदा सुव्यवस्थेदृष्टीने पोलिस अशा सोर्सकडून आलेल्या माहितीला गांभिर्याने घेत असतात. शक्यता, अशक्यतेचा विचार न करता 'अलर्ट' होत कामाला लागत असतात. याचाच प्रत्यय बुधवारी रात्री कळंब पोलिसांना आला. साधारणतः आठच्या सुमारास  पोलिसांना एक गुप्त माहिती मिळते. ढोकी रस्त्यावरील एका हॉटेलात मैफल जमवलेल्या तिघा तरूणापैकी एकाकडे गावठी बंदुक असल्याचे ते 'इनपूट ' असते. यास गांभिर्याने घेत पोलिस 'अ‍ॅक्शन मोड' वर येतात. पोना सुनिल हंगे, मिनाज शेख प्रारंभी 'सिव्हिल ड्रेस' वर हॉटेल गाठत दुरून टेहळणी करतात. यात बंदुकीसम वस्तूची   खात्री पटल्यानंतर तात्काळ पोनि तानाजी दराडे यांना अवगत करतात.

तद्नंतर पोनि तानाजी दराडे, सपोनि अशोक पवार, पोलिस कर्मचारी सुनिल हंगे, मिनाज शेख,प्रशांत राऊत, गणेश वाघमोडे, शिवाजी राऊत, पठाण आदींचा फौजफाटा त्या हॉटलच्या दिशेने मार्गस्थ होतो. यावेळी समोरचा व्यक्ति कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय? याची माहिती नसल्याने, तो कशाप्रकारे प्रतिकार करेल याची शाश्वती नसल्याने पोलिसांच्या ताफ्यात काही शस्त्रसज्ज कर्मचारी सहभागी होते. यास्थितीत तयारीनिशी आलेल्या पोलिस पथकाने त्या व्यक्तिला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

पकडली पिस्तूल , निघाले लायटर....त्या तरूणांकडून हस्तगत केलेली वस्तू हुबेहूब पिस्तुल दिसुन येत असल्याने बारकाईनं पाहणी केली असता ती पिस्तुल नसून सिगारेट पेटवण्याचे 'लायटर' असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत एका 'ई कॉमर्स' कंपनीकडून सदर लायटर मागवल्याचे तरूणांने सांगितले. यानंतर पोलिसांनी सुस्कारा टाकला अन् ठाणे डायरीत नोंद करुन त्यास सोडण्यात आल्याचे समजते. सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

माहिती घेऊन सोडलेआम्हाला गुप्त माहिती मिळाली. यास गांभिर्याने घेत प्रथम खात्रीसाठी एक पथक पाठवले. यानंतर लागलीच मागून आम्ही दाखस झालो. यात पिस्तूलसारखी दिसणारी, परंतु लायटर असलेली वस्तू मिळून आली. समोरच्या व्यक्तींची चौकशी करत, वर्तणूकीची माहीती घेत त्यास सोडले. अशा प्रकरणी गांभिर्याने घेत कार्यवाही करावी लागते.- तानाजी दराडे, पोलिस निरिक्षक, कळंब

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद