उमरगा - विशेष रस्ते दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत उमरगा शहरासाठी सुमारे ९ काेटी ५० लाख रूपये एवढा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती आमदार ज्ञानराज चाैगुले यांनी दिली.
उमरगा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत निधी मिळावा यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला हाेता. या अनुषंगाने उमरगा तालुक्यातील २ रस्त्यांच्या कामासाठी ९.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून घरणी-निलेगाव-उजेड-निटूर-लांबोटा-निलंगा- कासार शिरसी-मुळज (राममा क्र.६५) व गुंजोटी- भुसणी-मुरूम-आष्टा कासार या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. निधी मंजूर केल्याबद्दल आ. चाैगुले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशाेकराव चव्हाण, पालकमंत्री गडाख यांचे आभार मानले आहे.