सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून आता शासकीय दवाखान्यांतील प्रसूतींचे प्रमाण वाढू लागले आहे. अवघ्या सात महिन्यांत ४ हजार १३० प्रसूती शासकीय सेंटरमध्ये झाल्या आहेत. तर केवळ २ हजार ८५६ प्रसूती खासगी दवाखान्यांत झाल्या.
शासकीय दवाखान्यात अधिकाधिक प्रसूती या नाॅर्मल व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आवश्यक साेयीसुविधाही माेफत मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अधिकतर गराेदर माता प्रसूतीसाठी शासकीय दवाखाना जवळ करतात.
म्हणून शासकीय रुग्णालयास पसंती...
माझ्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची हाेती. खाजगीत गेल्यानंतर आणि सिझर झाल्यास पैसे आणायचे काेठून, असा प्रश्न हाेता. त्यामुळे मी प्रसूतीसाठी गावातीलच आराेग्य केंद्रास प्राधान्य दिले. तिथे उत्तम सेवा मिळाली.
-सुभाबाई काेठावळे
माझी पहिली प्रसूती शासकीय दवाखान्यातच झाली असल्या कारणाने मला तेथील सुविधांची माहिती हाेती. त्यामुळे दुसऱ्या प्रसूतीलाही खासगी दवाखान्याचा विचार केला नाही. घरची मंडळीने खासगीचा पर्याय मांडला हाेता. परंतु, मी नकार दिला.
-शामल साेनवणे
तालुका तसेच ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात साेयीसुविधांमध्ये वाढ केली आहे. डाॅक्टर तसेच अन्य कर्मचारी निवासी असतात. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या गराेदर मातांना साेयीसुविधा पुरविण्यात अडचणी येत नाही. यातूनच शासकीय रुग्णालयीन प्रसूतींचे प्रमाण वाढत आहे.
-डाॅ. मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी, उस्मानाबाद.