यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, रुग्णालय सदस्य समिती सदस्य आनंद कंदल्ले, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. चंचला बोडके, डॉ. श्रीधर जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांनी कोविड रुग्णांची परिस्थिती व लसीकरणाबाबत माहिती घेऊन त्याबद्दल सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला मंडळ प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने परिचारिकांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाताई सोमाजी यांच्या वतीने करण्यात आला. यात परिचारिका सविता क्षीरसागर, शांता भोसले, सुलक्षणा मोरे, शिल्पा निकम, पार्वती चव्हाण, शिवानी आडसूळ, प्रभावती इंगळे, कुरुलकर, धोत्रे, कुंभार व शीतल यांचा समावेश आहे. यावेळी संस्था सचिव रूपाली घाडगे, अपर्णा बर्दापूरकर, लता सोमाजी व रुग्णालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे सागर कदम यांनीही उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांचा सत्कार केला. यावेळी किरण कदम व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.