वाशी : पीक पेरणी अहवालात पारदर्शकता यावी, शासनाने स्वतंत्र ॲप उपलब्ध करून दिले आहे. याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यासाेबतच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी थेट गाेलेगाव शिवारातील बांधावर पाेहाेचले.
क्षेत्रीय स्तरावर पीक पेरणी अहवाल संकलित व्हावा, यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी ई-पीक पाहणी हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठा, तहसीलदार नरसिंग जाधव यांनी थेट गाेलेगाव, कडकनाथवाडी शिवारील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. एवढेच नाही तर पीक नाेंदणीच्या अनुषंगाने मार्गदर्शनही केले. यावेळी मंडळ अधिकारी डी. पी. गायकवाड, गोलेगावचे तलाठी विनोद सूर्यवंशी, मंडळ अधिकारी डी. ए. माळी, कडकनाथवाडी गावचे तलाठी आर. बी. पडवळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित हाेते.