वाशी (जि़उस्मानाबाद) : विहिरीचे खोदकाम सुरु असताना वापरण्यात आलेल्या जिलेटीन कांडीचा स्फोट होऊन एका राजस्थानी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दहिफळ शिवारात घडली आहे़ याप्रकरणी एकाविरुद्ध मृत्यूसकारणीभूत ठरल्याचा गुन्हा शनिवारी वाशी ठाण्यात नोंदविण्यात आला आहे़वाशी तालुक्यातील शेंडी येथील तुकाराम वीर यांच्या शिवारातील शेतीत विहिरीचे खोदकाम सुरु होते़ यासाठी राजस्थानी कामगारांकरवी जिलेटीन स्फोटकांचा वापर करण्यात आला होता़ यातील एका जिलेटीन कांडीचा स्फोटच झाला नाही़ याची खातरजमा न करता रामलाल मेघवंशी (रा़शिवपुरी जि़अजमेर) याने सहकारी कामगार भोगाराम गुलाजी मेघवंशी व अन्य एक पप्पू नावाच्या व्यक्तीस विहिरीत नवीन छिद्रे घेण्यासाठी उतरविले़हे काम सुरु असतानाच जिलेटीन कांडीचा जोरदार स्फोट झाला़ या घटनेत भोगाराम हा गंभीर जखमी झाला तर पप्पू किरकोळ जखमी झाला़
जिलेटीनच्या स्फोटात एकाचा मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:08 AM