शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची तारीख घोषित केली; म्हणाले, तोवर हाच पठ्ठ्या काम करणार
2
१५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली...; धनंजय महाडिकांचे धक्कादायक वक्तव्य
3
सुप्रिया सुळेंच्या सभेला तब्बल चार तास उशीर, अर्धा हॉल झाला खाली 
4
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
5
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
6
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
7
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
8
“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला
9
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
10
ना सेक्स, ना डेटिंग! डोनाल्ड ट्रम्प जिंकताच हजारो महिलांनी विरोधात उघडली कोरियाई मोहिम 
11
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
12
मुस्लिम संघटनेच्या १७ मागण्या मान्य केल्याचे पत्र 'खोटं'; शरद पवार गटाचा खुलासा
13
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
14
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
15
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
16
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
17
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."
18
Arvind Kejriwal : "आम्ही जे आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं, पंजाबमध्ये लाच..."; अरविंद केजरीवालांनी विरोधकांना घेरलं
19
दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका
20
ठाकरे गट, मविआच्या धारावी पुनर्विकास विरोधामागे कष्टकऱ्यांचा द्वेषाची प्रवृत्ती: राहुल शेवाळे

साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी अवघे २३ शिक्षक; आक्रमक पालकांनी झेडपी शाळेला ठोकले टाळे

By बाबुराव चव्हाण | Published: August 07, 2024 3:32 PM

शिक्षकांसाठी पालक आक्रमक, शाळेला ठाेकले टाळे अन् गावबंदचाही निर्णय

- बाळासाहेब स्वामीईट (जि. धाराशिव) : एकीकडे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत असताना दुसरीकडे ईट सारख्या गावातील शाळेत सुमारे साडेअकराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असतानाही पटसंख्येनुसार शाळेला शिक्षक नाहीत. ३६ शिक्षकांची गरज असताना आजघडीला अवघे २३ शिक्षक ज्ञानदान करताहेत. विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान लक्षात घेऊन पालकांनी पाठपुरावा केला. मात्र, शिक्षण विभागाने ठाेस कार्यवाही केली नाही. शिक्षण विभागाच्या अशा धाेणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी थेट शाळा गाठून कुलूप ठाेकले. यानंतर गाव बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला.

भूम तालुक्यातील ईट येथे जिल्हा परिषदेची पीएम श्री प्रशाला आहे. या शाळेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे साडेअकराशे विद्यार्थी आहेत. एवढेच नाही तर नववी व दहावीसाठी सेमी इंग्रजीही सुरू आहे. सलग दहा वर्षांपासून सेमी इंग्रजीचा निकाल १०० टक्के आहे. एकूणच शाळेच्या गुणवत्तेमुळे प्रत्येक वर्षी पट वाढत चालला आहे. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक दिले जात नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीने वेळाेवेळी पाठपुरावा केला. आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या धाेरणाविराेधात मागील तीन दिवसांपासून शाळा व्यवस्थापन समिती, स्वाभिमानी युवा ब्रिगेड यांच्या वतीने सयाजी हुंबे यांनी उपाेषण सुरू केले आहे. असे असतानाही शिक्षक मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ‘‘साहेब, आमच्या मुलांना शिकू द्या’’, असे म्हणत पालकांनी बुधवारी सकाळी दहा वाजता शाळा गाठली. शिक्षक नसतील तर मुलांना शाळेत पाठवून उपयाेग काय? असा प्रश्न करीत थेट शाळेला कुलूप ठाेकले. एवढेच नाही, गुरूवारी ईट गाव बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जाेपर्यंत शिक्षक मिळत नाहीत, ताेवर माघार नाही असा ठाम निर्धार पालकांनी बाेलून दाखविला. याप्रसंगी संदिपान कोकाटे, विनोद वाडकर, ईश्वर देशमुख, मनोज वाघवकर, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब चव्हाण, राजाभाऊ हुंबे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमेश्वर स्वामी, उपाध्यक्ष शितल हुंबे व शेकडो पालक उपस्थित हाेते.

दाेन मुलांसाठी दाेन गुरूजी, मग आमच्यावर अन्याय का?जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी अडचणीत आल्या आहेत. काही ठिकाणी तर दाेन विद्यार्थ्यांसाठी दाेन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, आमच्याकडे साडेअकराशे विद्यार्थ्यांसाठी ३६ शिक्षक आवश्यक असताना आजघडीला २२ ते २३ कार्यरत आहेत. एवढे कमी शिक्षक असतील, तर गाेरगरीबांची मुले शिकतील कशी, असा सवाल यावेळी पालकांकडून उपस्थित करण्यात आला.

दाेन वर्षांपासून गुरूजी गैरहजरजिल्हा परिषद शाळेवरील एक शिक्षक मागील दाेन वर्षांपासून गैरहजर आहे. कागदाेपत्री हे पद भरलेले दिसते. मात्र, प्रत्यक्षात कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांचे अताेनात नुकसान हाेत आहे. त्यामुळे संबंधित गैहजर शिक्षकाची बदली करून पर्यायी शिक्षक द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

महिला पालकांची लक्षणीय उपस्थितीसकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पालकांनी शाळा गाठली. यामध्ये पुरूष पालकांसाेबतच महिलांचीही माेठी संख्या हाेती. गाेरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार असेल तर शाळेत मुलं पाठवायची कशासाठी, असा सवालही या पालकांतून करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाOsmanabadउस्मानाबाद