कोरोना च्या जागतिक संकट काळात एक सुजान भारतीय नागरिक या नात्याने मानव सेवेच्या राष्ट्रीय कार्यात अमुल्य योगदान दिल्याबद्दल राज्य गुणवंत कामगार असोशियन महाराष्ट्र, लाईव्ह संवाद आणि निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, कामगार, सांस्कृतिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोरोना योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार ऑनलाईन सन्मानपत्र २५ मे रोजी वितरित करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातून लक्ष्मणराव सरडे, शाहूराज कापरे, राजाभाऊ आंधळे, बाबासाहेब गरड, विजय गायकवाड, शशिकांत सावंत, चंद्रकांत थोरात, वासुदेव वेदपाठक, दादाराव संगने, मधुकर बिद्री, रमेश बनसोडे, ह.भ.प महादेव अडसूळ, डी.के.कुलकर्णी, डॉ. एम. डी. डिकले, अच्युतराव माने, सुरेश टेकाळे, सुभाष घोडके, संजय घोगरे,सचिन क्षिरसागर,बंडू ताटे,श्रीहरी डावकरे,शंकर मुळे, बशीर पठाण,ह.भ.प बळीराम कवडे, नितीन माने, प्रा.डॉ.संजय कांबळे, ॲड.घनश्याम रितापुरे, वैभव पौळ, शुभांगी पौळ आदींना सन्मानपत्र ऑनलाइन मिळाले. दरम्यान, प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ह.भ.प महादेव महाराज आडसूळ,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, सुभाष घोडके, माधवसिंग राजपूत यांचा रामेश्वर खाते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष किरण मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार अविनाश घोडके यांनी केले .
कोरोना योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराचे ऑनलाईन वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:32 AM