उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आजवर सुमारे ३ लाख ४८ हजार ९१९ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार ग्रामीण व शहरी भागातील मिळून १ हजार ८४४ नवीन कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तसचे २३४ सारीचे रूग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा दिवसागणिक संसर्ग वाढत होता. रूग्णसंख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीस पायबंद घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून १४ सप्टेबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. याद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. उपक्रमाचा पहिल्या टप्प्यात ३ लाख ५७ हजार ६०३ पैकी ३ लाख ४८ हजार ९१९ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले.
या माध्यमातून नव्याने १ हजार ८४४ कोरोना बाधित रूग्ण समोर आले. एवढेच नाही तर सारीचेही ३३४ रूग्ण आढळून आले आहेत. साधारण सर्दी, खोकला कणकणीने त्रस्त असलेले १ हजार ४४ तर दमा, मेंदू, लिव्हर आदी आजाराने त्रस्त असलेले २ हजार २२० रूग्ण आढळून आले आहे. या सर्व रूग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर औषधांना ते कसा प्रतिसाद देतात? हेही आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून पाहिले जात आहे. या उपक्रमाध्ये उस्मानाबाद पहिल्या दिवसापासून पहिल्या दोनमध्ये आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्याने आता दुसरा टप्प १४ आॅक्टोबरपासून हाती घेण्यात येणार आहे.
दृष्टिक्षेपात आढळलेले रूग्णआजार संख्याकोविड : १८४४सारी : २३४सर्दी, खोकला : १२४४इतर : २२२०कुटुंब संख्या - ३५७६०३कुटुंबांचा सर्वे - ३४८९१९