सुरूवातीच्या काळात चित्रपट नंतर मालिका आणि आता विविध वेबसिरीजच्या माध्यमातून पुरूष तसेच महिलांना तंबाखूजन्य पदार्थ, दारू सेवन करताना दाखविले जात आहे. व्यसनाधीनतेच्या या उदात्तीकरणामुळेच की काय, आज अल्पवयीन मुले पानटपरीवर सिगारेट ओढताना दिसून येतात. हीच बाब नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्व्हेतून समाेर आली आहे. २०१५-१६ मध्ये झालेल्या सर्व्हेत जिल्ह्यातील पुरूष तसेच महिलांतील व्यसनाधीनतेचे प्रमाण दर्शविण्यात आले नव्हते. केवळ राज्याचे प्रमाण दिले हाेते. तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणार्या पुरूषांचे प्रमाण ३६.५ टक्के एवढे हाेते. २०१९-२० मध्ये झालेल्या सर्व्हेचा अहवालही नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार हे प्रमाण ३३.८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. राज्याच्या तुलनेत तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक आहे. दर शेकडा जवळपास ४४ पुरूष तंबाखूजन्य पदार्थ सेवन करतात. तंबाखूजन्य पदार्थ सेवनात आता महिलाही मागे राहिलेल्या नाहीत. राज्याचे प्रमाण ५.८ टक्के असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रमाण ८ टक्के इतके आहे. हे चित्र चिंता वाढविणारे तर आहे, शिवाय व्यसनमुक्ती चळवळीला चपराक देणारेही आहे.
चाैकट...
०.३ टक्के महिलांना दारूचे व्यसन...
दाररू सेवनाचे प्रमाण कासवगतीने का हाेईना महिलांमध्येही वाढू लागले आहे. ही बाब २०१९-२० च्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्व्हेक्षणातून समाेर आली आहे. दारू सेवन करणार्या महिलांचे दर शेकडा प्रमाण ०.३ टक्के इतके आहे. तर राज्याचा आकडा ०.४ टक्के आहे. हे प्रमाण काही पाॅईंटमध्ये असले तरी चिंतेत भर टाकणारे मानले जात आहे.
चाैकट...
दृष्टिक्षेपात उस्मानाबाद जिल्हा...
व्यसनाचा प्रकार पुरूष महिला
तंबाखूजन्य पदार्थ ४२.२ टक्के ८.० टक्के
मद्य सेवन १२.४ टक्के ०.४ टक्के
काेट...
तंबाखूजन्य पदार्थ वा दारूचे सेवन निश्चितच आराेग्यासाठी घात आहे. ज्याचा आपल्या आराेग्यावर विपरित परिणाम हाेता. राष्ट्रीय आराेग्य सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून समाेर आलेला डाटा चिंता वाढविणारा आहे. हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जनजागृतीसाेबतचठाेस उपायाेजना हाती घेण्यात येतील.
-डाॅ. अनुमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा परिषद.