उस्मानाबाद : पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील ३४ गावातील ९२ हजार ७८७ ग्रामस्थांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ तर २५१ गावांसाठी ३६५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ वाढत्या पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातून अधिग्रहण, टँकरचे प्रस्तावही प्रशासनाकडे धडकू लागले आहेत़
पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट निर्माण झाला आहे़ प्रकल्प कोरडेठाक पडल्याने गावा-गावाच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत़ त्यात इतर जलस्त्रोतांनीही दम तोडल्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत़ परिणामी प्रशासनाकडे टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत़ प्रशासनाने सध्या ३४ गावांसाठी ४५ टँकर सुरू केले आहेत़ तर एकूण २५१ गावांसाठी ३६५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
यात उस्मानाबाद तालुक्यातील ११ गावांसाठी १८ टँकर सुरू करण्यात आले आहेत़ टँकर भरण्यासाठी १९ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ६६ गावांसाठी १०३ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तुळजापूर ३६ गावांसाठी ६५ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ उमरगा तालुक्यातील एका गावात दोन टँकर सुरू आहेत़ टँकरसाठी २ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ७ गावांसाठी ९ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ लोहारा तालुक्यातील २० गावांसाठी २६ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ कळंब तालुक्यातील ७ गावांसाठी ९ टँकर सुरू आहेत़ टँकरसाठी ८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ३८ गावांसाठी ६० विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे
भूम तालुक्यातील ११ गावांसाठी १२ टँकर सुरू करण्यात आले आहेत़ टँकर भरण्यासाठी ८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ७ गावांसाठी ८ अधिग्रहणे तर वाशी तालुक्यातील १३ गावांसाठी १५ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ परंडा तालुक्यातील ४ गावांसाठी ४ टँकर तर हे टँकर भरण्यासाठी ४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ तर ३१ गावांसाठी ३५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ ही परिस्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता भीषण होण्याची शक्यता आहे़
या गावात सुरू आहेत टँकरउस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बा़), रूई ढोकी, नांदुर्गा, खामगाव, येडशी, बेंबळी, ताकविकी, केशेगाव, करजखेडा, वाणेवाडी, उमरगा तालुक्यातील बेळंब, कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव, भाटशिरपुरा, देवळाली, मस्सा खंडेश्वरी, शेलगाव (ज़), पिंपळगाव (डो़), भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरूड, सावरगाव, वारंवडगाव कासारी, गोरमाळा कृष्णपूर, आंबी, हिवर्डा, गोलेगाव, अंतरगाव तर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी, मुगाव, कुक्कडगाव आदी गावांना टँकरचा आधार मिळत आहे़
टँकरच्या २८ खेपा कमीजिल्ह्यात सुरू असलेल्या ४५ टँकरच्या १२१ खेपा मंजूर आहेत़ प्रत्यक्षात ९३ खेपा झाल्या असून, २८ खेपा कमी झाल्या आहेत़ गावापासून दूर असलेले अधिग्रहण, अधिग्रहणाचे कमी झालेले पाणी, विजेचा अभाव आदी कारणांमुळे मंजुरीच्या प्रमाणात खेपा होत नसल्याचे सांगण्यात आले.