शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘एसटी’च्या उस्मानाबाद विभागाने वर्षभरात जमवला पावणेदोनशे कोटींचा गल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 16:58 IST

तब्बल सहा कोटी किलोमीटर केला प्रवास

उस्मानाबाद : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन शहरांसोबतच ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. वर्षभरात एसटीने ६ कोटी १ लाख किलोमीटर रस्ता कापत सुमारे पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत गल्ल्यामध्ये दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही ग्रामीण भागातील दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे  मागील काही दशकांच्या तुलनेत खाजगी प्रवासी वाहतुकीचे जाळे विस्तारले असले तरी महामंडळाच्या बसचे महत्व आणि उपायोगिता आजही कायम आहे. महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा, भूम, कळंब आणि उमरगा हे सहा आगार येतात. या सर्वच आगारांकडून मागील दोन-तीन वर्षांपासून प्रवासी वाढविण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. प्रवास भाडे सवलत योजनाही राबविल्या जात आहेत. तसेच वातानुकुलित बससेवाही सुरू केली आहे.

या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून की काय, दुरावलेले प्रवासी पुन्हा महामंडळाच्या सेवेकडे वळू लागले आहेत. त्यानुसार ‘एसटी’च्या गल्ल्यातही भर पडू लागली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा आगारांच्या ३९६ बसेसने ५ कोटी ९२ लाख ६१ हजार किलोमीअर रस्ता कापत पावणेदोनशे कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, २०१८-१९ या आर्थिक वर्षात उस्मानाबाद विभागाच्या ताफ्यात नव्याने सहा गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे बसेसची संख्या ४०२ वर जावून ठेपली. या सर्व बसेसने मिळून ६ कोटी १ लाख ५ हजार किलोमीटर प्रवास केला. यातून १६७४ कोटी १६ लाख ५२ हजार रूपये एवढे उत्पन्न मिळाले. २०१७-१८ च्या तुलनेत महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाच्या गल्ल्यात तब्बल दोन कोटींची जास्तीची भर पडली आहे. एवढे नाही तर बसेसने ८ लाख ४४ हजार किमीचा प्रवासही अधिक केला. उरोक्त आकडेवारी पाहता, कोणाला नसले आले तरी एसटी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाला तर ‘अच्छे दिन’ आले, असे म्हटल्याच वावगे ठरणार नाही. 

कोणी किती जमवला गल्ला?उस्मानाबाद विभागातील तुळजापूर आगाराने ३७ कोटी ८६ लाख, उमरगा ३१  कोटी ७ लाख, भूम २४ कोटी १६ लाख, कळंब २९ कोटी ५१ लाख, परंडा ११ कोटी ९४ लाख तर उस्मानाबाद आगाराने २९ कोटी ६२ लाखांचा गल्ल जमवला आहे.  

कोणाचा किती प्रवास?उस्मानाबाद आगाराच्या ८२ बसेसने १ कोटी ३५ लाख, तुळजापूरच्या ८० बसगाड्यांनी  १ कोटी ३२ लाख, उमरग्याच्या ६५ बसेसने १ कोटी २ लाख, भूम ५९ बसगाड्यांनी ८३ लाख, कळंबच्या ७१ बसेसने १ कोटी १ लाख, तर परंडा आगाराच्या ३५ गाड्यांचा मिळून ४१ लाख किलोमीटर प्रवास झाला.

टॅग्स :state transportएसटीMONEYपैसाOsmanabadउस्मानाबाद