उमरगा : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष केला आणि इथल्या बहुजनांसाठी चवदार तळे खुले केले. या क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा, उमरगा तालुका शाखेच्या वतीने शनिवारी शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सोनबा येलवे नावाने पाणपोई सुरू करण्यात आली. यासाठी ॲड. महादेव ढोणे यांनी आर्थिक सहकार्य पुरविले. पाणपोईचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष सुरवसे, अश्विनीताई कांबळे, कविता सुरवसे, रंजना सुरवसे, प्रभाकर गायकवाड, जीवनराव सूर्यवंशी, अविनाश भालेराव, राजेंद्र सूर्यवंशी, किरण कांबळे, शेखर कांबळे, समता सैनिक दलाचे सर्व सैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय कांबळे सर यांनी केले. तालुकाप्रमुख निखिल गायकवाड यांनी आभार मानले.
क्रांती दिनानिमित्त पाणपोई केली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:34 AM