शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

परांड्याचा पेच सुटला, जागा पवारांकडे; ठाकरेसेनेच्या पाटील यांची ३ मिनिटे बाकी असताना माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 3:51 PM

चर्चेअंती जागा शरद पवार गटाला आपल्या पारड्यात पाडण्यास यश आले.

धाराशिव: मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात यावेळी उद्धवसेना व शरद पवार गटाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. मात्र, ही जागा शरद पवार गटाला आपल्या पारड्यात पाडण्यास यश आले. ठाकरेसेनेच्या रणजीत पाटील यांनी अखेरच्या क्षणी ३ मिनिटे बाकी असताना २ वाजून ५७ मिनिटांना उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे येथे शिंदे सेनेचे तानाजी सावंत यांना पवार गटाच्या राहुल मोटे यांचे थेट आव्हान असेल.

राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यातच उध्दवसेनेने आधीच उमेदवार जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, राहुल मोटे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाकरेसेनेच्या रणजीत पाटील यांनी देखील एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता. येथे मैत्रीपूर्ण लढत होईल अशी राजकीय गोटात चर्चा सुरू होती. दरम्यान, ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी पवार गटाने परांड्याच्या जागेवरून निर्माण झालेला पेच आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोडवला. यात पवार गटाला जागा सोडवून घेण्यात यश आले. त्यानंतर आज अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना रणजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. 

कोण आहेत राहुल मोटे?राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००४, २००९ आणि २०१४ या तीन निवडणुकांत विजय मिळविला आहे. मोटे यांनी रणजित पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांचा दोन वेळा पराभव केला आहे.

लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?मागच्या लोकसभा निवडणुकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघातून उद्धवसेनेचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना ८१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तेव्हाचे मुद्दे आता पूर्णत: राहिले नसले तरी ती वावटळ अजूनही पूर्णपणे शमलेली नाही. लोकसभेला सोयाबीन दराचा मुद्दा मतदारांनी उचलून धरला होता. आताही तो आहेच. त्यातून महायुती कसा मार्ग काढते? यावर बरेच काही अवलंबून आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparanda-acपरांडाSharad Pawarशरद पवार