शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

वीजबिल थकाबकी दुप्पटीवर गेल्याने २४ लाईनमनवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 7:48 PM

गत महीन्यातही काही कर्मचाऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी असा दणका दिला होता.

ठळक मुद्देवेतनातील २५ टक्के रक्कम केली कपात

कळंब (जि. उस्मानाबाद) : गत मार्चच्या तुलनेत यंदा थकबाकी दुप्पटीवर गेली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याचे खापर आता लाईनस्टाफच्या कर्मचाऱ्यांवर फोडण्यास सुरुवात केली आहे.यातूनच तालुक्यातील २४ लाईनस्टाफच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनातून २५ टक्के रक्कम दंड स्वरूपात कपात केली आहे. या प्रकारामुळे फिल्डवरील कर्मचाऱ्यांनी मात्र आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

कळंब शहरासह तालुक्यातील ९५ गावात विजपुरवठा करण्याचे काम महावितरण करत आहे. यासाठी कळंब येथे उपकार्यकारी अभियंता तर इटकूर, शिराढोण, दहिफळ, मोहा, येरमाळा, गोविंदपूर व कळंब येथे शाखा कार्यालय आहेत. या अंतर्गत कळंब येथे १३२ केव्ही विजकेंद्र तर इतर १७ ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्र कार्यरत आहेत. यातून वीज वितरण करणारे महावितरणचे उपकेंद्र, त्यावरील फिडर, विद्युत वाहिण्या व रोहित्र यांचे मोठे जाळे तालुक्यात पसरले आहे. याच्या देखभाल, किरकोळ दुरूस्तीची व वीज देयकांच्या वसूलीची जबाबदारी गावपातळीवरील लाईनस्टाफवर सोपवण्यात आली आहे. तालुक्यात यासाठी जवळपास १३९ विद्युत तंत्रज्ञ कार्यरत आहेत.

याशिवाय आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ४५ अन्य तंत्रज्ञ काम पाहत आहेत. ग्रामीण भागातील विद्युत वितरणाची संपूर्ण जबाबदारी उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर देखभाल व दुरूस्तीच्या कामाचा मोठा भार असतानाच, वसूलीची जबाबदारी ही त्यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. अलिकडील काळात ग्रामीण भागातील घरगुती वापराच्या ग्राहकांच्या विद्युत देयकासंदर्भात असंख्य अडचणी आहेत. अव्वाच्या सव्वा आकारलेली देयके ग्राहक स्विकारत तर नाहीतच शिवाय त्यांच्या दुरूस्तीसाठी महिनो न महिन्याचा कालापव्यय होत आहे. असे असतानाही वीज वितरण कंपनीने विद्युत बिल वसुलीच्या कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत लाईनस्टाफमधील २४ कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनात कपात करण्याची कारवाई महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मासिक देय  वेतनाच्या २५ टक्के रक्कम दंडात्मक रक्कम म्हणून कपात करण्यात आली आहे. गत महीन्यातही काही कर्मचाऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी असा दणका दिला होता. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजOsmanabadउस्मानाबाद