येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये कल्पवृक्ष महोगणी वृक्षाची लागवड उमरग्याचे तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, अशोक पतंगे, केंद्रप्रमुख शीला मुदगडे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने प्रत्येकी तीन वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने जवळपास एक हजार वृक्षाची लागवड होणार आहे. महोगणी हे सागवान वृक्षासारखे उपयोगी आणि औषधी वृक्ष आहे.
गतवर्षी प्रशालेत मियावाकी जंगल निर्मिती करून ४ हजार ५०० वृक्षांची लागवड व संगोपन अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. यासाठी शिक्षक बशीर शेख, बलभीम चव्हाण, संजय रूपाजी, सरिता उपासे, सोनाली मुसळे, ममता गायकवाड, मुख्याध्यापक बाबूराव पवार यांनी परिश्रम घेतले.