(फोटो : २६)
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील जवाहर महाविद्यालय व प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने वनसंवर्धन सप्ताहानिमित्त महाविद्यालय परिसरात दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच लागवड केलेले वृक्ष प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी दत्तक घेऊन संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.
यावेळी चन्नबसव सामाजिक संस्थेच्या ट्री बँकेच्यावतीने महाविद्यालयास अकरा वृक्ष भेट देऊन, जांभूळ आणि पेरुच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वर्षभरामध्ये महाविद्यालयाच्या प्रांगणात एक हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यावेळी प्राचार्य डॉ. उमाकांत चन्नशेट्टी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास चन्नबसव सामाजिक संस्थेचे संस्थापक शिवशंकर तिरगुळे, डॉ. एम. एस. लंगडे, डॉ. डी. एस. सूर्यवंशी, डॉ. अंकुश कदम, डॉ. जी. टी. राठोड, डॉ. अनिता मुदकन्ना, सचिन तोग्गी, डॉ. दीपा कलशेट्टी, डॉ. एस. एम. बाड, डॉ. अमोल पाचपिंडे, प्रा. विवेकानंद वाहुळे, डॉ. एस. ए. सांगळे, डॉ. एस. व्ही. राजमाने, डॉ. चंद्रकांत जाधव, डॉ. विश्वास माने, प्रा. एस. डी. आगलावे, काशिनाथ करपे, नामदेव काळे, गणेश सर्जे, काकडे आदी उपस्थित होते.